या पुस्तकामध्ये चरकसंहितेमधील १०० कल्पांचे विस्तृत वर्णन आहे.
अधिकरण, घटकद्रव्ये, निर्माणविधी अशा अनेक मुद्दयांद्वारे कल्पांचे अध्ययन त्याचप्रमाणे फलश्रुतीतील प्रत्येक अवस्थेमध्ये सदर कल्पाचे कार्य कसे होते याचेही विवरण आहे.
या पुस्तकाचे संपादक वैद्य धनंजय कुलकर्णी असून प्रस्तावना ज्येष्ठ वैद्य रमेश नानल यांची लाभली आहे. सदर मराठी पुस्तकाच्या १००० प्रती प्रकाशनपूर्व संपल्याचा विक्रम विशेष आहे.
“चरकस्तु चिकित्सिते” या उक्तीचा प्रत्यय या पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे नक्कीच येईल. विद्यार्थी व चिकित्सक या दोघांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.





Reviews
There are no reviews yet.